Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! रखडलेले 4 हप्ते एकत्र; खात्यात थेट ₹6000 जमा होणार?

Ladki Bahin Yojana 6000 Rupees Installment Come Together 2026 : लाडकी बहीण योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात अजूनही ज्ञानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. दरम्यान, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे. याचसोबत आता अनेक महिलांना मागच्या ३ महिन्याचे पैसे जाले नाहीत. आता महिलांना सर्व हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांना डिसेंबरपासून मार्चचे 6000 रुपये एकत्र मिळणार का असा प्रश्न सर्वाच्याच मनात निर्माण झाला आहे.

केवायसीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेत मडिलांच्या ई केवायसी करताना अनेक चुका झाल्या आहेत. ई केवायसीमधील चुकांमुळे मडिलांच्या खात्यात डिसेंबरपासून पैसे जमा झाले नाहीत. केवायसीगध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने ही अडचण झाली आहे. दरम्यान, त्यानंतर केवायसीमधील चुका सुधारण्यासाठी मुटत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर सर्व रखडलेले पैसे एकत्र येणार का असा प्रश्न पडला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसीमधील दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही त्याआधी हे काम केले नाही तर पैसे बंद होणार आहेत. महिलांना वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे, त्यानंतरच महिलांचा लाभ पुन्हा सुरु होईल.

महिलांच्या खात्यात 6000 रुपये जमा होणार? (Ladki Bahin Yojana 6000 Rupees May Come

एकत्र)

अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबरपासून पैसे जमा झाले नाहीत. केवायसीमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा दृप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांच्या खात्यात चार महिन्याचे 6000 रुपये एकत्र येऊ शकतात, याबाबत कोणतीत्री अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

Leave a Comment