School Closed : आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

School Closed 24th January 2026 : नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना शुक्रवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ‘हिंद दी चादर’ या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून तसेच परदेशातून हजारो भाविक नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे भाविकांची सोय, वाहतूक नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

२४ व २५ जानेवारीला भव्य धार्मिक कार्यक्रम

‘हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादूर साहेबजी ३५० वा शहीदी समागम’ हा कार्यक्रम २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेड शहरातील मोदी मैदानावर पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० एकर क्षेत्रावर भव्य मंडप उभारण्यात आला असून, भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

देशातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

भाविकांसाठी विशेष व्यवस्था

कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लंगर (मोफत भोजन), वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

विद्यार्थी व पालकांसाठी सूचना

२४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment