भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवी पाससाठी नोकरीची मोठी संधी; 650 जागांसाठी भरती

Reserve Bank of India Bharti 2026 : (RBI) अंतर्गत Assistant पदांसाठी 2026 मधील भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशातील बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

भरतीचा तपशील

  • पदाचे नाव: असिस्टंट
  • एकूण रिक्त जागा: 650
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता

  1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक).
  2. संगणकावर Word Processing चे मूलभूत ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा (01 फेब्रुवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 20 वर्षे
  • कमाल वय: 28 वर्षे

वयोमर्यादेत सूट:

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

परीक्षा शुल्क

  • General / OBC / EWS: ₹450/-
  • SC / ST / PWD: ₹50/-

वेतन आणि भत्ते

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला ₹29,000 बेसिक पे दिला जाईल.
महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर सुविधांसह एकूण मासिक वेतन अंदाजे ₹58,514 पर्यंत जाऊ शकते.

RBI मध्ये नोकरी ही केवळ चांगल्या पगारासाठीच नव्हे तर सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि उत्तम करिअर वाढीसाठी ओळखली जाते.

अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 मार्च 2026
  • पूर्व परीक्षा (Preliminary Exam): 11 एप्रिल 2026
  • मुख्य परीक्षा (Main Exam): 07 जून 2026
  • अधिकृत संकेतस्थळ: rbi.org.in

महत्त्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी योग्य स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करणे हितावह ठरेल.

ही संधी गमावू नका – बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ही उत्तम संधी आहे!

PDF जाहिरात येथे पहा

ऑनलाईन अर्ज

Leave a Comment