Viral Video 2026 : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे कलावंतांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. डान्स, गाणे, अभिनय, चित्रकला किंवा इतर कोणतेही कौशल्य असो—हौशी कलाकार आपली कला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. अनेकदा असे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात आणि त्यातून संबंधित कलाकारांना मोठी ओळख मिळते.
सध्या अशाच एका कॉलेजमधील तरुणींच्या ग्रुपचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे दहा तरुणींनी एकत्र येत आकर्षक नृत्य सादर केले. “एक लाजरानं साजरा मुखडा चंद्रावाणी खुलला गं” या गाण्यावर त्यांनी तालबद्ध, देखणे आणि उत्साही सादरीकरण केले आहे.
या नृत्यातील त्यांचा आत्मविश्वास, चेहऱ्यावरील भाव, नजाकत आणि स्टेप्समधील एकसंधता प्रेक्षकांना भावली आहे. प्रत्येक स्टेपमध्ये असलेली अचूकता आणि अदा पाहून अनेकांनी व्हिडिओ वारंवार पाहिल्याचे कमेंटमध्ये नमूद केले आहे. काहींच्या मते, हा डान्स पाहताना आपोआप पाय थिरकू लागतात. त्यांच्या पारंपरिक आणि आकर्षक लूकमुळे सादरीकरणाला अधिकच उठाव मिळाला आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @through_devis_lens या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत साठ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि एक लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्येही प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एका युजरने “खूप सुंदर डान्स” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्याने “आईशप्पथ… अप्रतिम सादरीकरण!” असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने “मराठी मुलगी कमाल आहे” असे लिहित अभिमान व्यक्त केला आहे. काहींनी “कडक डान्स” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियामुळे अशा तरुणांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला तर अशा कलाकारांना भविष्यात मोठ्या मंचावर झळकण्याची संधी नक्कीच मिळू शकते.