दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Maharashtra SSC Admit Card 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एसएससी हॉल तिकीट 2026 अधिकृतपणे उपलब्ध करून दिले आहे. मंडळाकडून 19 जानेवारी 2026 रोजी हॉल तिकीट जाहीर करण्यात आले असून, लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेतली जाणार आहे.
हे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना थेट डाउनलोड करता येणार नसून, संबंधित शाळांमार्फत ते डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
एसएससी हॉल तिकीट 2026 कुठे उपलब्ध आहे?
शाळा प्रशासन खालील अधिकृत संकेतस्थळांवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकते –
- mahahsscboard.in
- mahahsscboard.maharashtra.gov.in
डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटवर शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट स्वीकारताना ही बाब नक्की तपासावी.
Maharashtra SSC Hall Ticket 2026 डाउनलोड करण्याची प्रक्रिया
शाळांसाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत खालीलप्रमाणे आहे :
- अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in उघडा
- Latest Notifications या विभागातील SSC लिंकवर क्लिक करा
- पान खाली स्क्रोल करून Login for Institute हा पर्याय निवडा
- SSC विभागाखालील Sign in Here वर क्लिक करा
- शाळेचा Username आणि Password टाका
- आवश्यक रोल नंबरची श्रेणी निवडा
- एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या
हॉल तिकीटमध्ये चूक असल्यास काय करावे?
जर हॉल तिकीटमध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक तपशील चुकीचे असतील, तर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी लागेल :
- संबंधित शाळेने ठराविक शुल्क भरून Application Correction या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा
- विभागीय मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्त केलेले हॉल तिकीट Correction Admit Card या पर्यायातून उपलब्ध होईल
- विषय किंवा शिक्षणाच्या माध्यमाशी संबंधित बदल असल्यास ते थेट विभागीय मंडळाकडे कळवणे आवश्यक आहे
- हॉल तिकीटवरील विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असल्यास, शाळेने योग्य फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का करून प्रमाणित करणे बंधनकारक आहे
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी हॉल तिकीट अनिवार्य आहे
- हॉल तिकीट सुरक्षित ठेवा आणि परीक्षा संपेपर्यंत जपून ठेवा
- कोणतीही चूक आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधा