Jalsampada Vibhag Bharti 2026 : राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा सध्या सुरू असून, संबंधित विभागांना त्यांच्या पदरचनेला (आकृतिबंध) मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार भरती प्रक्रियेसंदर्भात गंभीर असून, ती लवकरच राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्मचारी संघटनांनी भरती प्रक्रियेत कंत्राटी पद्धतीला विरोध दर्शवला असून कायमस्वरूपी भरती करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागातील भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती
माहिती अधिकारातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, डिसेंबर २०२५ अखेर खालील पदे रिक्त आहेत:
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १५३४ पदे
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – २७८ पदे
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) – १४२ पदे
यामुळे एकूण हजारो पदे भरली जाण्याची शक्यता असून, अभियंता पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
सेवा नियमांनंतरच भरती प्रक्रिया
सुधारित सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार ही माहिती देण्यात आली आहे. जर या माहितीसंदर्भात कोणाला हरकत किंवा अपील करायचे असल्यास, संबंधित अपिलीय प्राधिकाऱ्याकडे ३० दिवसांच्या आत अर्ज करता येईल.
मेगा भरतीत मोठा वाटा
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ७५ हजार पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात एक लाखाहून अधिक पदे भरली गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
आता नव्या मेगा भरती मोहिमेत जलसंपदा विभागातील सुमारे १४ हजार पदांचा समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. या अंतर्गत विविध ४०+ पदांच्या गटात भरती होणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
उमेदवारांसाठी मोठी संधी
ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू ठेवणे गरजेचे आहे.