SSC-HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

10th-12th Result Online : दहावी-बारावीची परीक्षा संपून आता महिना होत आला. आता विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. मे किंवा जून महिन्यात दहावी-बारावीचा निकाल लागू शकतो. दरम्यान, निकाल कोणत्या तारखेला लागणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जेव्हा निकाल लागू होईल तेव्हा तुम्ही तो ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात. त्यामुळे या वेबसाइटच्या लिंक आताच सेव्ह करून ठेवा. (10th-12th Result Date)

निकाल कुठे अन् कसा पाहाल? (How To Check HSC SSC Result)

तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतात.

या लिंक निकालाच्या दिवशी ओपन होतील. तेव्हा तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

  • https://www.mahahsscboard.in/mr
  • https://mahresult.nic.in
  • https://sscresult.mkcl.org
  • https://hscresult.org

निकाल पाहण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस (SSC HSC Result Online Step By Step Process)

तुम्हाला वरील कोणत्याही एका वेबसाइटवर जायचे आहे. https://mahresult.nic.in/ या वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला दहावी किंवा बारावी असा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यानंतर आईचे नाव लिहायचे आहे.

यानंतर तुम्ही रिझल्ट या बटणवर क्लिक करा. तुमच्यासमोर तुमची मार्कशीट ओपन होईल.

तुम्ही ई मार्कशीट डाउनलोडदेखील करु शकतात. तसा पर्याय तुम्हाला दिसेल.

मार्कशीटची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

Leave a Comment