Mahanagarpalik bharti 2026 : महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने भरती प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सामान्य प्रशासन व विधी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले, केवळ रिक्त पदे भरण्यावर न थांबता शासनस्तरावर आवश्यक त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती मिळविण्यासाठीही पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करावी.
आयुक्तांनी गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘ड’ या श्रेणींतील पदांसाठी थेट भरती प्रक्रिया
राबविण्याचे निर्देश दिले. तसेच राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती तयार करून त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.
बैठकीत विधी विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर मांडली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.