Namo Farmer Honor Fund Scheme 2026 : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम टप्प्याटप्प्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
पुढील हप्ता कधी मिळणार?
सध्या शेतकऱ्यांचे लक्ष या योजनेच्या पुढील हप्त्याकडे लागले आहे. उपलब्ध माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना
नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात.
आतापर्यंत पीएम किसान योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, २२वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळणार?
पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणतः दर चार महिन्यांनी दिले जातात. पीएम किसानचा मागील हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झाला होता. त्यामुळे फेब्रुवारीत पुढील हप्ता अपेक्षित आहे.
याच कालावधीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा झाल्यास, शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ४,००० रुपये (२,००० + २,०००) जमा होण्याची दाट शक्यता आहे.
किती शेतकऱ्यांना लाभ?
राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सध्या सुमारे ९० ते ९४ लाख पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर सुमारे ७ ते ८ दिवसांच्या आत राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
जिल्हा परिषद निवडणुका ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असल्याने, त्याआधीच ही आर्थिक मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.